श्री क्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा श्री रोकडेश्वर हनुमान पायी दिंडी सोहळाचे आयोजन! ——————————– गुरुवार दि. 4 जुलै रोजी भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरापासून दिंडीचे होणार प्रस्थान–ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर)
शिर्डी ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा गुरुवार 4 जुलै ते गुरुवार 18 जुलै 2024 या कालावधीत श्री रोकडेश्वर हनुमान पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून गुरुवार चार जुलै रोजी सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरापासून या दिंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
अशी माहिती या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक ह भ प संजयजी महाराज जगताप व सहमार्गदर्शक अड.प्रमोद( दादा ) मुरलीधर जगताप यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की , श्री रोकडेश्वर हनुमान महाराज, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, समर्थ सद्गुरु संत श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा श्री क्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा पायी दिंडी सोहळाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या दिंडी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. हा पायी दिंडी सोहळा गोडेंगाव, देवळाली, ,नांदगाव, एमआयडीसीअहमदनगर, करमाळा, टेंभुर्णी असा हातात भगवा झेंडा, भगवी पताका ,हातात टाळ, मुखाने पांडुरंगाचे भजन व जय हरीचा जय घोष करत, मजल दरमजल पायी प्रवास करत पंढरपूरला पोचणार आहे. पंढरपूरला महादेव लक्ष्मणराव परचंडराव, चिंचोली गेट समोर, ट्रॅक्टर शोरूम समोर, टेंभुर्णी रोड, अहिल्या चौक, पंढरपूर येथे दिंडीचा विसावा राहणार आहे.रस्त्यामध्ये तेरा मुक्काम होणार आहेत. रस्त्यामध्ये दिंडीतील पायी वारकऱ्यांना सकाळी चहा ,नाश्ता, दुपारी जेवण ,सायंकाळी चहा व मुक्कामाच्या ठिकाणी रात्री भोजन ठीक ठिकाणच्या दानशूर भाविकांकडून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी आरामाच्या ठिकाणी व सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ, प्रवचन, किर्तन, ठिकठिकाणी भक्तीरिंगण होणार आहे. पंढरपुरात दिंडी पोहोचल्यानंतर बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी हभप संजयजी महाराज जगताप
(भऊरकर) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी सहा ते आठ होणार असून नंतर फराळाचा महाप्रसाद व गुरुवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी हभप संजयजी महाराज जगताप यांचेच सकाळी नऊ ते अकरा या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे. या
दिंडीत येणाऱ्या वारकऱ्यांनी बिछाना बरोबर आणावा. कोणत्याही मौल्यवान वस्तू आणू नयेत. त्याचप्रमाणे दिंडी सोहळ्यामध्ये धार्मिक नियमांचे पालन करावे. असे आवाहनही या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक व प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप
(भऊरकर )यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.