राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी.
लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नुकतीच छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि जागतिक अंमली पदार्थ विरोधी व व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, विजयश्री कदम, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ आदींच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कन्या विद्यालयाच्या वर्गशिक्षिका विजयश्री कदम या होत्या. यावेळी हर्षदा टाचतोडे, प्रांजल पंडित, संचिता मेटे, हर्षदा दरंदले या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर पल्लवी घुले व रूपाली टाचतोडे या विद्यार्थिनींनी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजयश्री कदम यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याचा गुणगौरव केला. यावेळी प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलविरा शेख हिने केले. तर कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती व व्यसनमुक्ती दिनानिमित्त उपप्राचार्य अलका आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले तर प्रतिभा ठोकळ यांनी सूत्रसंचालन व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
.