बाभळेश्वर येथे ज्येष्ठ नागरिकांनी राबविले स्वच्छता अभियान
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
बाभळेश्वर (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा,)
बाभळेश्वर येथील ज्येष्ठ नागरिक विचार मंच, विविध कार्यकारी सोसायटी,ग्रामपंचायत
आणि पद्मश्री विखे पाटील विद्यालय यांनी संयुक्तिकरित्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बाभळेश्वर येथे ग्राम स्वच्छता अभियान राबविले. उपक्रमाची सुरुवात बाभळेश्वर येथील पांडुरंग मंदिरापासून करण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिकांसह युवकांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदविला. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक विचार मंच चे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी बेंद्रे यांनी उपक्रमाची रूपरेषा सांगितली. स्वच्छता अभियानानंतर वीरभद्र मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ एकत्रित जमून ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारासाठी सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाभळेश्वरच्या सरपंच दिवंगत विमलताई म्हस्के यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तान्हाजी बेंद्रे यांनी देशावर आणि आपल्या गावावर प्रथम प्रेम करावे. गावाची स्वच्छता ही गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. प्रवरा शिक्षण संस्थेच्या ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल बेंद्रे यांनी ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती आहे. तरुण पिढीने त्यांचा अनुभव नजरेसमोर ठेवून त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे असे नमूद करून ज्येष्ठ नागरिकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती तुकाराम बेंद्रे, बाभळेश्वर चे माजी सरपंच बाळासाहेब बेंद्रे, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब बेंद्रे, कारभारी शिंदे, भास्कर शिंदे, ज्ञानदेव बेंद्रे,तुकाराम शिंदे, धोंडीराम बनसोडे, अशोक क्षीरसागर, बाभळेश्वर विविध का.सोसायटीचे चेअरमन दौलत बेंद्रे उपस्थित होते. बाभळेश्वर ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल डहाळे यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला आभार माझी उपसरपंच अमृत मोकाशी यांनी मानले.