Breaking
राजकिय

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

0 9 1 3 8 6

 

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

 

 

मुंबई( सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार आहे. तसे महत्त्वाचे अपडेट्स राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे केली.
राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे