आंबिलखिंड येथे पर्यावरण मेळावा व सह्याद्री गुणगौरव सोहळा संपन्न.
*(निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेचे उद्घाटन संपन्न)*
प्रवरानगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या अबितखिंड येथे जिल्हास्तरीय पर्यावरण स्नेही मेळावा आणि विद्यार्थी व शेतकरी गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रमणीय व निसर्गरम्य चाळीसगावचे डांगण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबितखिंड या छोट्याशा गावात निसर्ग व पर्यावरण प्रदूषण मंडळाचे महाराष्ट्रातील पहिल्या शाखेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे- गुणवरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पर्यावरण प्रेमी स्नेहीजणांना सह्याद्री आदिवासी सेवा संघ मुंबई व अखिल भारतीय आदिवासी संघ नवी दिल्ली, मुंबई विभाग या संस्थांच्या वतीने मंडळाच्या सचिव वनश्री मोरे-गुणवरे, कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण गुणवरे कार्याध्यक्ष राजश्री आहेर, जिल्हा संघटक रामेश्वर चेमटे, राज्य संघटक व आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले, मुख्याध्यापक सचिव डॉ. अनिल लोखंडे यांना सह्याद्री गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, अहमदनगर तालुका नायब तहसीलदार बेरड साहेब, मंडळाच्या कार्याध्यक्ष छायाताई रजपूत, उपाध्यक्ष प्रकाश केदारी, सहसचिव संजय गायकवाड, जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, राज्यसंघटक बाळासाहेब गाडेकर, अहमदनगर रोटरी क्लबचे सुनील घुले, राज्यसंघटक संजय कारखिले, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रा. महेश पाडेकर, पत्रकार विजय बोडखे, पत्रकार कोंडीराम नेहे यांच्यासह आदी मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक राज्यसंघटक रामनाथ भोजने, जिल्हा संघटक चंद्रकांत भोजने, सरपंच यमुनाताई घनकुटे, मुख्याध्यापक दशरथ फापाळे, गोविंद घनकुटे, भानुदास घनकुटे, विजय गोडे, मुरलीधर गोडे, दीपक राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.