प्रसिद्ध चित्रपट गायक व गझल गायक श्री हरिहरन यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन!
शिर्डी (प्रतिनिधी) मराठी, हिंदी, कन्नड, मल्लाळी ,तामिळ, तेलुगु, भोजपुरी आदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व सुप्रसिद्ध पार्श्वगायक व गजल गायक श्री हरीहरन यांनी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी प्रसाद शाल देऊन सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. त्याचप्रमाणे गायक हरीहरण यांचे कुटुंबीय हे उपस्थित होते.
सन २००४ साली हरिहरन यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. बॉर्डर या हिंदी चित्रपटातील मेरे दुश्मन ह्या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1998 ला मिळाला आहे. तर जोगवा या मराठी चित्रपटातील जीव दंगला गुंगला रंगला या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2009 मध्ये त्यांना देण्यात आला होता. ते अनेक प्रसिद्ध गाण्याचे पार्श्वगायक आहेत. अशा सुप्रसिद्ध गायक तसेच लोकप्रिय गजल गायक हरिहरन हे शिर्डीला आलेचे समजताच त्यांचे चाहते, प्रेक्षक , उपस्थित साईभक्त, ग्रामस्थ यांनीही त्यांना पाण्यासाठी गर्दी केली होती तसेच अनेकांनी त्यांना हात हलवत अभिवादन केले.