श्री क्षेत्र निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे राजुरी ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत !
विजय बोडखे
राजुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
हातात भगव्या पताका…. पांडुरंगाच्या नामाचा गजर, टाळ मृदुंगाची साथ घालत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पांडुरंगाच् दर्शनासाठी पंढरपूर कडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याचे राहाता तालुक्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजता राजुरी येथील सरपंच, उपसरपंच ,राजुरी सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन, ग्रामस्थ युवक संघटना, भाविक भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात फटाक्याची आतच बाजी करून राजुरी येथे मुक्कामी आलेल्या या दिंडीचे जोरदार स्वागत केले असून राजुरी येथे भक्तांचा महासागर लोटला असल्याचे चित्र राजुरी व परिसरात पहावयास मिळाले आहे. राहता तालुक्यातील राजुरी येथे श्री संत श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याचा गावातील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हायचं चेअरमन सदस्य आजी – माजी कार्यकर्ते गावातील युवक कार्यकर्ते तसेच राजुरी भजनी मंडळाच्या वतीने या दिंडीचे फटाक्याची आत्ताच भाजी करून भव्य स्वागत करण्यात आले असून गावांमध्ये विविध ठिकाणी कमानी व फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात या दिंडीचे स्वागत करून गावात संध्याकाळी सहा ते सात या वेळेत प्रवचन होत असते. यानंतर गावातील नागरिकांकडून जमा झालेल्या भाकरी व आमटीचे राजुरी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येथे यानंतर रात्री ८ ते ९ किर्तन होऊन शनिवारी सकाळी या दिंडीचे श्रीरामपूर कडे प्रस्थान होते. चालू वर्षी या दिंडीमध्ये 50 ते 60 हजार हून अधिक भाविक मोठ्या भक्ती भावाने आणि आनंदाने सहभागी झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून हरिनामाचा गजर करत टाळ मृदंगाचा तालावर विविध अभंग गात ज्ञानोबा तुकाराम चा गजर करीत हे वारकरी तल्लीन झाले असून टाळ मृदंगाच्या गजरात पारंपारिक वाद्य वेशभूषा करून अनेक गावकरी पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करीत दर्शन घेत असून ही निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर येथून निघालेल्या या दिंडीमध्ये अनेक पुढारी गावातील प्रमुख कार्यकर्ते महिला युवक सहभागी झाले असल्याचे चित्र या दिंडीमध्ये पहावयास मिळत असून या दिंडीमध्ये विविध सुविधा शासनाकडून व काही ठराविक भाविक भक्तांकडून पुरविल्या जात असून फिरता दवाखाना, फिरते शौचालय, दिंडीसाठी लागणाऱ्या सुविधा, पोलीस यंत्रणा असे विविध डिपार्टमेंटचे लोक सहभागी झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दिंडी श्रीरामपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. फोटो. श्री क्षेत्र निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने जात असून राजुरी तालुका राहता येथे मुक्कामी या दिंडीचे आगमन झाले यावेळी राजुरी येथील ग्रामस्थांनी फटाक्याची आताच बाजी करून भव्य स्वागत करण्यात आले.
(छायाचित्र विजय बोडखे संतोष गोरे राजुरी)