महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी शिर्डीत येऊन घेतले साई दर्शन! शिर्डी विमानतळावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे केले जोरदार स्वागत!
शिर्डी( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी आज गुरुवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे आज गुरुवार 19 सप्टेंबर 2024 रोजी विमानाने शिर्डी विमानतळावर आले असता त्यांचे अ.नगर जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींसह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महामहीम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे शिर्डीत आले. त्यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे पूजा, आरती केली व दर्शन घेतले. महामहीम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी येथील श्री गुरुस्थान मंदिरात तसेच श्री द्वारकामाईत जाऊनही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, आदी यावेळी उपस्थित होते. साई दर्शनानंतर साई संस्थांनच्या वतीने महामहीम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.