शिर्डीत हॉटेल शांतीकमल येथे डॉ. सुजय विखे पा. यांच्या उपस्थितीत फूल उत्पादक व फूल विक्रेत्यांची बैठक संपन्न! ————————– मा.उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या प्रतिक्षेत , त्याआधी फूल हार संदर्भात पुर्वतयारी करुन ठेवणार – डॉ. सुजय विखे पाटील!
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
शिर्डी येथील हॉटेल शांतीकमल येथे मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत फूल उत्पादक व फूल विक्रेत्यांची नुकतीच बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली .
यावेळी डॉक्टर सुजय विखे पा. यांनी उपस्थित फुल उत्पादक व विक्रेत्यांसमोर मार्गदर्शन करताना म्हटले की,आम्ही मा.उच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहोत. त्याआधी फूल हार संदर्भात पुर्वतयारी करुन ठेवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 12 जुलैला या संदर्भात निकाल अपेक्षित आहे. माननीय न्यायालयाने संस्थांनच्या त्रि सदस्यीय समितीकडे बाबांना अर्पण केलेल्या फुल, पुष्पहार यांची विल्हेवाट कशी लावणार! या संदर्भात संस्थांनचा अहवाल मागितला असून तो संस्थांनने दिला आहे. लवकरच त्यावर माननीय उच्च न्यायालय सकारात्मक निर्णय देईल. अशी आशा आहे. त्या पार्श्वभूमीवरच पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली असून फुल उत्पादकांना शिर्डी नगर परिषदेच्या साह्याने येथे स्वतंत्र अशी फुल विक्री मार्केट साठी जागा तसेच तेथे शेड बांधून देण्यात येईल. असे आश्वासन देत शिर्डी व परिसरातील तसेच सर्वपक्षीय अशा 15 ते 20 फुल उत्पादक शेतकऱ्यांची एक समिती ही फुलांचे भाव तसेच विक्री,भाव या संदर्भात निर्णय घेण्या संदर्भात नेमली जाईल. असे सांगत शिर्डी नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संस्थांनच्या त्रि सदस्यीय समितीकडे फुल विक्री संदर्भात सुमारे 24 पॉईंट (नियम )दिले आहेत. त्यापैकी 12 नियम त्री सदस्यीयसमितीने स्वीकारून माननीय उच्च न्यायालयाकडे दिले आहेत .अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिन्याच्या आत शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढू , सध्याच्या परिस्थितीत येथिल एक महिन्यात 60 ते 70 टक्के गुन्हेगारी ही कमी होईल. असा प्रयत्न करू, असे आश्वासन देत आता आपणास वेळ आहे त्यामुळे वेळ देता येईल. असे त्यांनी हसत हसत सांगतिले.तसेच काही आमच्या मिञांनी म्हटले की, हार फुलांचा निर्णय हा शेतकऱ्यांचा विजय..चांगली गोष्ट आहे. पण ते विसरले ,ते शेतकरी आमचेच होते . असे सांगत माझ्या पराभवामागे साईबाबांचा काहीतरी उद्देश असावा , त्यामुळेच आता भरपूर काम करण्यास वेळ मिळाला आहे.बाबांच्या आशीर्वादाने पुन्हा कामाला लागलो आहे. असे शेवटी डॉ.सुजय विखे पाटील यांनी यावेळी म्हटले. यावेळी माजी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (आबा) गोंदकर, कैलास सदाफळ, विजय कातोरे, त्याचप्रमाणे शिर्डी व परिसरातील रुई ,सावळीविहीर, राहता ,अस्तगाव ,पिंपळवाडी, नांदुरखी, कणकुरी आदी परिसरातील फुल उत्पादक, विक्रेते, शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.