मा.खा.राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत २ जुलै रोजी राहुरी येथे मार्केट यार्ड समोर रस्ता रोको आंदोलन सर्व दूध व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे.
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
दुधाला 40 रुपये दर व उसाला दूसरा हप्ता 300 रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थीतीत २ जुलै मंगळवारी रोजी राहुरी येथे मार्केट यार्ड समोर रस्ता रोको आंदोलन होणार आहे. तरी सर्व दुध उत्पादक व ऊस उत्पादक शेतकरी बंधूनी या आंदोलनात सहभागी व्हावी असे आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे.
शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,आंदोलनाच्या वेळी खालील मागण्यांची निवेदन देण्यात येणार आहे.
* दुधाला ४० रुपये दर मिळावा. तसेच दुध उत्पादक शेतकऱ्याचे प्रति लिटर पाच रुपये अनुदान तातडीने मिळावे.२) दुधाला एमएसपी लागू करावी. ज्या प्रमाणे उसाला एफआरपी २००९ – २०१० ला सुरु त्याचप्रमाणे दुधास हमी भाव मिळवा
* भेसळयुक्त दुधाची चौकशी करून कडक कारवाई करावी.4) ऊसाला दुसरा हप्ता 300 रुपये प्रमाणे ताबडतोब हयावा. ५) मागील वर्षीचा विमा तातडीने वर्ग करून दुष्काळ निधी घ्यावा.६) शेतक-याचे विजबिल व सरसकट कर्ज माफ करावे.
*शेतमालावरील निर्यात बंदी कायम स्वरूपी उठवावी.8) केंद्र सरकारने दुध पावडर, मका, सूर्यफूल इत्यादी वस्तु आयात करण्याचे ठरविले आहे ते धोरण तातडीने बदलावे ९) शेतीसाठी लागणारे खते, औजारे, औषधे यांच्यावरील जीएसटी माफ करावा अशा मागण्या त्यावेळी करण्यात येणार आहे
पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारने शेतकरी संपविणेचे षडयंत्र आखले आहे.कांदा निर्यात बंदी लावून कांदा उत्पादक संपवला आता दूध,सोयाबीन,मका यांचे भाव पाडण्याचे काम सुरु आहे मागील वर्षी सोयाबीन 6500 ते 7000 रुपये क्विंटल या भावाने विक्री झाली. परंतु कच्चे तेल आयात करूनु सोयाबीनचे दर 4000 ते 4500 हजार रुपयांवर घसरले आहे. गेली महिन्यापासून दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील वर्षी दुधाला 38 रुपये ते 40 रुपये भाव मिळत होता. आज दुधाचे दर प्रति लिटरला 22 ते 25 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, असे असताना केंद्र सरकारने दूध पावडर १० हजार टन आयातीला परवानगी दिली. सुर्यफुल तेल १ लाख ५० हजार टन तसेच ४ लाख ९८ हजार ९०० टन मका आयातीला परवानगी दिल्यामुळे मागील वर्षी 1800 ते 2000 रुपये क्विंटल मका विकत होती ती आज 1000 ते 1200 रुपये क्विंटल विकण्याची शक्यता आहे. अशा अनेक कारणांमुळे आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील तरुण नोकरीसाठी शहरात स्थलांतरित होत आहे. तरी आपल्या न्याय हक्कासाठी व शेतमालाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने च्या आंदोलनात सहभागी व्हा ,असे आव्हान शेळके यांनी केले.