महाराष्ट्र
केंद्रीय युवा कामकाज व क्रीडा राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षा खडसे यांनी शिर्डीला येऊन घेतले साईबाबांचे दर्शन!
0
9
1
3
9
8
शिर्डी (प्रतिनिधी)
केंदीय युवा कामकाज व क्रिडा राज्यमंत्री नामदार श्रीमती रक्षा खडसे यांनी आज रविवारी शिर्डीला भेट दिली. त्या येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी येथे श्री साई मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे होत्या. साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.
0
9
1
3
9
8