सी.ई टी.चा.उज्ज्वल परंपरा कायम.. प्राचार्य आनंद काकडे.
लोहगाव ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
महात्मा गांधी संकुलातील विद्यार्थी स्वावलंबी शिक्षणाची धडे घेत आहेत. विद्यार्थ्यांचे कष्ट आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमातून कनिष्ठ महाविद्यालयाने सीईटीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम जोपासली आहे, असे कौतुकास्पद उद्गार प्राचार्य अंगद काकडे यांनी काढले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात सीईटी निकालानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंगद काकडे हे होते. याप्रसंगी प्राचार्य काकडे उपप्राचार्य अलका आहेर आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. या महाविद्यालयातील एकूण सीईटी व नीट परीक्षेसाठी ३५ विद्यार्थी प्रविष्ट झाली होती. त्यापैकी १५ विद्यार्थी हे सीईटी परीक्षेत ९० टकक्यांच्या पुढे आहेत,तर नीट परीक्षेत दोन विद्यार्थिनीनी ६३७ पेक्षा अधिक गुण मिळविली आहेत. नीट परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनी ऐश्वर्या मंडलिक व प्रतीक्षा कापसे तसेच सीईटी परीक्षेत दोन्ही ग्रुपमध्ये यश मिळविणारी विद्यार्थी सोहेल शेख, अनन्या भोर, वैभव जवरे, जय ताजने, आदित्य मोकाशी, सृष्टी थेटे, ओम वरखडे, आदित्य विखे यांच्या बरोबरच त्यांच्या पालकांचा तसेच इ. ११ वी वर्गात प्रविष्ट होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचा सन्मान प्राचार्य अंगद काकडे उपप्राचार्य व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऐश्वर्या मंडलिक, यश ताजने, मीना भोर व अलका आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य काकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सीईटी व नीट परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक करुन शुभेच्या दिल्या. याप्रसंगी सुभाष भोर, बाबासाहेब थेटे, नितीन राऊत, राहुल पेंढारे, चारुदत्त पवळ, विशाल मदने, योगेश कोरडे, विलास विखे, कविता विखे, बालिका मंडलिक, राजाराम जवरे, बाळासाहेब वरखेडे, ज्योती भोसले, आनंद भोसले ही पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर ज्ञानदेव दवंगे यांनी आभार मानले.