Breaking
महाराष्ट्र

महिला सशक्तिकरण अभियान, व विविध विकास कामे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ आज शुक्रवारी शिर्डीत! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग , महसूल, आणि महिला बालकल्याण मंत्रीही उपस्थित राहणार!

0 9 1 4 0 0

 

शिर्डी ( प्रतिनिधी) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील यशस्वी अंमलबजावणीच्या निमित्ताने व महिला सशक्तिकरण मेळाव्यासाठी शिर्डी येथे राज्याचे मुख्यमंत्री ,एकनाथराव शिंदे, व दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. त्यांच्या शिर्डी दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

शुक्रवार दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहाच्या मागील पटांगणावर दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरण अभियान, तसेच राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी मतदारसंघात विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहत ,अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी थीम पार्क, पशुवैद्यकीय महाविद्यालय ,पोलीस कार्यालय राहता व जिल्ह्यातील विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याबरोबरच उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विविध योजनांचे लाभार्थी, नागरिक येथे उपस्थित राहावेत. असे नियोजन येथे करण्यात आले आहे.दरम्यान काल गुरुवारी सदरील कार्यक्रम स्थळाची महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. तसेच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांवर असलेली जबाबदारी आणि केलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.व या महिला सशक्तिकरण मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे व या मेळाव्याचे अतिशय उत्तम असे नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.याप्रसंगी डॉ सुजय दादा विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषजी येरेकर यांच्या सह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

महिलांना दरमहा आर्थिक लाभ देणारी तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे महिला भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण संपूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून योजनेला गती मिळाली. या योजनेंतर्गत अकोले तालुक्यात ७६ हजार ४७१ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. संगमनेर तालुक्यात १ लाख ३१ हजार ८८, कोपरगाव ७६ हजार १०८, श्रीरामपूर ७३ हजार ३६३, नेवासा ९४ हजार ७८२, शेवगाव ६० हजार ४४७, पाथर्डी ६३ हजार ८११, जामखेड ४१ हजार ७६५, कर्जत ६० हजार ५२८, श्रीगोंदा ७९ हजार १२३, पारनेर ६९ हजार १४२, राहूरी १ लाख २६ हजार १६१, राहाता ८५ हजार २३० तर अहमदनगर तालुक्यामध्ये १ लाख १४ हजार ४३७ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत,

योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७२० महिलांना २४७ कोटी ४१ लाख ६० हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र महिलांना पुढील टप्प्यात जुलै २०२४ पासून दरमहा रुपये १ हजार ५०० प्रमाणे तीन महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे.शुक्रवारी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागातर्फे तसेच शासनाच्या विविध विभागाकडून, जनसेवा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 4 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे