पोलीस हवालदार संजय पंढरीनाथ जाधव यांचा नुकताच पोलीस महासंचालक पदक देऊन करण्यात आला गौरव !
प्रवरानगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पुणे शहर गुन्हे शाखा युनिट दोन मध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष असे संजय पंढरीनाथ जाधव यांचा नुकताच पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.
एक मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मुहूर्तावर राज्यांमध्ये उत्कृष्ट पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा गौरव करण्यात येतो. तसा यावर्षीही उत्कृष्ट पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
श्री . संजय पंढरीनाथ जाधव (२५७२ )पोलीस हवालदार हे १९९७रोजी पोलीस दलात मुंबई येथे रुजू झाले. मुंबईनंतर ते २००५ साली पुणे शहर पोलीस येथे आले. आत्तापर्यंत त्यांनी पोलीस मुख्यालय, विश्रामबाग पोलीस स्टेशन,भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि आत्ता सध्या पुणे शहर गुन्हे शाखा युनिट दोन येथे ते काम करीत आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या २८ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना दि.१ मे रोजी पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित केले. माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार पुणे शहर यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे त्यांना सन्मानित करण्यात आले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. सदरक्षणाय खलनिग्रहणालय या ब्रीदवाक्यप्रमाने त्यांनी आतापर्यंत काम केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे .
संजय पंढरीनाथ जाधव हे अतिशय कर्तव्यदक्ष , निस्वार्थी व कायद्याचा अभ्यास असणारे पोलीस हवालदार असून त्यांना पोलीस महासंचालक पदकाने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.