श्री रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत लाखो साईभक्तांची मंदीयाळी! अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची पोथी व प्रतिमेची मिरवणूक, समाधी मंदिरात संस्थांनचे अध्यक्ष सुधाकर यार्लागड्डा यांनी संपत्निक केली पाद्यपूजा! उत्सवाच्या मुख्य दिवशी द्वारकामाई मंदिरात विधिवत पूजन करून बदलण्यात आले गव्हाचे पोते!
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी आज बुधवार 17 एप्रिल 2024 रोजी श्री द्वारकामाई मंदिरातील गव्हाचे पोते विधिवत पूजन करून बदलण्यात आले.
साईसंस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सपत्नीक द्वारकामाईतील बदलण्यात येणा-या गव्हाच्या पोत्याची श्री साईबाबा समाधी मंदिरात विधीवत पुजन करुन गव्हाचे पोते बदलण्यात आले. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी व मंदिर पुजारी उपस्थित होते. तत्पूर्वी श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री द्वारकामाई मंदिरात चाललेल्या अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप कार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी साईफोटो घेवून सहभाग घेतला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच साई समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते. आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्री राम जन्म कीर्तन कार्यक्रम , दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत डॉ. लता सुरेंद्र, मुंबई यांचा आयना, प्रभु रामाचा महाकाव्य प्रवास हा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ०४.०० वाजता निशाणाची मिरवणुक व सायंकाळी ०५.०० वाजता श्रींचे रथाची गावातून मिरवणुक निघणार आहे .सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री. विजय साखरकर, साईसेवा नृत्योत्सव, मुंबई यांचा साईस्वर नृत्योत्सव कार्यक्रम होणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने आज बुधवार 17 एप्रिल 2024 रोजी साईसमाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून, या दिवशी श्रींची शेजारती व गुरुवार १८ एप्रिल रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होणार आहे.
श्रीराम नवमी उत्सवानिमित्त लाखो साई भक्त शिर्डी दाखल झाले असून दर्शनासाठी मंदिरात साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे .त्याचप्रमाणे शिर्डी शहरातही साई भक्तांची गर्दी असून साईनामाच्या जयजयकारांने साईनगरी दुमदुमून गेली आहे. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना साई संस्थांनच्या वतीने पिण्याचे पाणी, आरोग्य ,निवास, व्यवस्था, सुरक्षितता, तसेच प्रसादालयात मिष्ठान्न भोजन , दर्शन रांगेत मोफत चहा कॉफी, आदी सर्वच सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.