कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी आदिनाथ ढाकणे.
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबळे.
स्वच्छ भारत आभियान अंतर्गत.देशात केंद्र सरकारद्वारे सर्व शहरे स्वच्छ होऊन.सगळी कडे
स्वच्छतेबाबत जनसहभागातून व्यापक चळवळ उभारली जावी यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच राज्य शासनाद्वारे पृथ्वी, जल, तेज, वायू आकाश पर आधारीत पर्यावरण संरक्षण वसुंधरा अभियान ४.० ची सुरुवात केली असून या मोहिमेच्या जनजागृती करिता गेल्या २५५ हुन अधिक आठवडे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीची अविरत पणे सेवा स्वच्छता करत असलेले आदिनाथ ढाकणे यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ४.० या अभियान करीता स्वच्छता व पर्यावरण दुत म्हणजेच ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नगरपारिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नियुक्ती करण्यात आली असून सहीचे नियुक्ती पत्र कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, नगरपरिषदेचे संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे, शहर समन्वयक गायत्री शहाणे यांच्या हस्ते आदिनाथ ढाकणे यांना देण्यात आले .
आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपरिषद शहरात स्वच्छतेची कामे उत्कृष्टरित्या सांभाळलेली आहेत तसेच सेवाभावी संस्था व शहरात केलेली कामे वाखाण्याजोगे केली असून त्यांचा या कार्याची व्याप्ती पाहता स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत शहरातील नागरीकांमध्ये व्यक्तिगत, स्वच्छता नदी, स्वच्छता श्रमदान कचरा विलगीकरण घरोघरी ओल्या कचन्यापासून कंपोस्ट खत बनविणे, वृक्ष लागवड व संगोपन, नविकरणीय उर्जा स्रोतांचा वापर करणे पाण्याची बचत पर्यावरण संरक्षण व संवर्धन आदी बाबत जनजागृती करणेकामी कोपरगाव नगरपरिषद मार्फत आदिनाथ ढाकणे यांची स्वच्छता व पर्यावरण दुत म्हणजेच ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नीयुक्ती करण्यात आली असून
अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र दूनबळे.सामाजिक कार्यकर्ते संदीप विघे. यांनी ढाकणे यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.तसेच त्याचे अनेक चाहत्यांकडून आभिंनदन होत आहे.