महावितरणच्या आश्वी बुद्रुक कार्यालयाच्या विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र यादव यांचे उपोषण ?
संगमनेर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आश्वी बुद्रुक यांनी माझ्या शेतातील गट नंबर २३ मध्ये १० पूल .गट नंबर २४ मध्ये एक डी पी मेन लाईन. ३ पोल गट नंबर 26 मध्ये मेन लाईन ३ पोल असून त्यामुळे माझ्या क्षेत्रातील विद्युत लाईनचे जाळे पसरले असल्यामुळे माझ्या शेतातील उत्पन्नात घट झाली आहे .
त्यामुळे मला कंपनीकडून मोबदला मिळावा अशी मागणी ओझर खु! येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र रामा यादव यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आश्वी बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या माझ्या शेतात विद्युत लाईफचे जाळे पसरले आहे. मला कंपनीकडून कुठलाही भाडे मिळत नाही. तरी माझ्या शेतातील डीपी पोल काढून द्यावेत किंवा कंपनीकडून त्या मोबदल्यात मला भाडे देण्यात यावे यासंदर्भात कंपनीने योग्य ती कारवाई न केल्यास मी.संगमनेर प्रांत कार्यालय कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणास बसणार आहे. याची नोंद घेऊन मला योग्य ती न्याय मिळावा अन्यथा उपोषणाचे सर्वस्वी जबाबदारी आपणावर व शासनावर राहील.
निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालय संगमनेर .संगमनेर पोलीस स्टेशन .जिल्हाधिकारी अहमदनगर. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आश्वी बुद्रुक यांना देण्यात आलेल्या आहे.