महाशिवरात्री निमित्त टाकळीभान येथे भाविकांचा गर्दीचा महापुर…
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारा महादेव म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री शंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव कार्यक्रम मोठ्या भव्य दिव्य व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. यावर्षी दर्शनासाठीचा भाविकांचा गर्दीचा उच्चांक होता व भाविकांमध्ये शंभू महादेवाच्या दर्शनाचा उत्साह यावेळी दिसून आला. पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनासाठी सुरुवात झाली, सकाळी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागून लांब लांब पर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी पहाटे रुद्र गंगाजल अभंग स्नानाने शंभू महादेव पिंडीस गंगाजल अभिषेक घालून पूजा आरती संपन्न झाली. तदनंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ह.भ.प रामेश्वर महाराज पवार यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली. व तदनंतर सर्व उपस्थित भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महादेव यात्रा कमिटी, ताई प्रतिष्ठान व संयोजकांच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध व चांगले नियोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भव्य स्वरूपात व उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी एकलव्य समाज संघटनेच्या वतीने झेंडा मिरवणूक अतिष बाजी व वाजत गाजत पार पडली. कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी , पीएसआय शिंदे, पो. शेंगाळे आदींनी भेट दिली तसेच उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले यावेळी पोलीस स्टेशनचे पो.हे. त्रिभुवन पो.हे. बाबर,पो. कराळे,बाबा सय्यद आदी उपस्थित होते. महादेव यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी महाशिवरात्री उत्सव कार्यक्रमात आपला छोटा, मोठा वाटा उचलणारे सर्वच दानशूर देणगीदार भाविकांचे आभार मानले.