संपादकीय
जीवनाच्या प्रत्येक समस्याचे उत्तर ज्ञानेश्वरीत आहे .ह भ प जगन्नाथ महाराज पाटील
0
9
1
3
7
9
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज )
ग्रंथाच्या माध्यमातून चांगले आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. जीवनाच्या प्रत्येक समस्याचे उत्तर ज्ञानेश्वरीत आहेत. समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि राजकारण राजनिती आणि मुल्यशास्त्र यांचा सार ज्ञानेश्वरीत असल्यामुळे प्रत्येकांने जीवनात ज्ञानेश्वरी समजून घेतली तरच आयुष्याचे सार्थक होईल असा संदेश अध्यात्मिक चळवळीतील निरुपणकार ह.भ.प जगन्नाथ महाराज पाटील यांनी दिला.
लोणीच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात २३ व्या. पद्मश्री डा.विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे तिसते पुष्प अध्यात्मिक चळवळीतील निरुपणकार ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील यांनी ज्ञानेश्वरी आणि आजचे जीवन या विषयावर अभ्यसपुर्ण असे मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, संचालक शांताराम जोरी, कार्यकारी संचालक अमोल पाटील, डॉ.नानासाहेब म्हस्के, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डॉ.आर.पवार यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
आपल्या प्रबोधनात जगन्नाथ महाराज पाटील म्हणाले की, महाराष्ट्र हे समतेचे राज्य आहे. प्रवरा परिसर भक्ती, कर्म, ज्ञान आणि क्रांतीची भुमी आहे. म्हणूनच येथे विचारांचा जागर कायम होत असतो. १६ व्यावर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तरुणांसाठी सोळावे वर्ष हे धोक्याचे नाही तर मोक्याचे, ज्ञानेश्वरीत बुवाबाजी नाही तर डोळस अध्यात्म आहे. ज्ञानेश्वरीतून जीवनाची संकल्पना, संवेदना कळते. निर्मयक्षमता, आत्मविश्वास, आदर्श विचार, अर्थकारण, राजनिती, ज्ञान प्राप्ती भक्ती आणि शक्ती समजते. सकात्मक विचार आज गरजेचे आहेत. ग्रंथाची श्रीमती समजून घेतली तरच आपण जीवनात ख-याअर्थाने श्रीमंत होऊ शकतो असे सांगून ज्ञानेश्वरी आणि आजचे जीवन याविषयी सविस्तर प्रबोधन केले.
विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी समजून घेण्याची गरज आहे. अभ्यासक्रमात ज्ञानेश्वरी असली तर ती व्यापक स्वरुपात येण्याची गरज व्यक्त करून चांगले माणसे कमवा, उच्चार चांगला ठेवा हा संदेश देतांनाच आनंदी होण्यासाठी प्रत्येक गोष्ट आनंदाने करा आणि ज्ञानेश्वरी प्रमानेच आपले जीवन ज्ञानी बनवा असे सांगितले.
प्राचार्या विद्या वाजे यांनी प्रास्ताविकांतून त्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.शांताराम चौधरी यांनी केले. आभार प्रभंजन भगत यांनी मानले. शुक्रवारी पाचवे शिक्षण तज्ञ पुणे येथील अनिल गुंजाळ हे चला आनंदाने जगू या याविषयांवर गुंफणार आहे.
0
9
1
3
7
9