Breaking
संपादकीय

विद्यार्थ्यांची सहल थेट नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात !

0 9 1 3 9 0

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया

_पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम; विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाचे धडे_

‘सहल’ म्हटलं डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे…थंडगार हवेची ठिकाणे…परंतु शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय
बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको. दरवर्षी पोलीस स्थापना दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवले जात असतात. सहलीला निमित्त होते पोलीस स्थापना दिनाचे. कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे, पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देत पोलीस निरीक्षकांनी राबवलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
नगर शहरातील तब्बल ५०० मुला-मुलींनी आणि शिक्षकांनी पोलीस ठाण्याच्या सहलीची अनुभूती घेतली यामध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय तसेच चाँद सुलताना विदयालय अहमदनगर या विद्यालयांचा सहलीत सहभाग होता. पोलीस ठाण्यात दैंनदिन कारभार कसा चालतो? पोलीस ठण्यात असणारे शस्त्र व इतर साहित्य दाखवुन त्या बाबत सविस्तर माहीती देण्यात आली.विदयार्थांना रस्ता वाहतुकीचे नियम ,महिला सक्तीकरण ,सायबर गुन्हे याबाबतही सविस्तर विश्लेषण करुन विदयार्थांना शाळेमध्ये अडचणी निर्माण होत असल्यास त्याबाबत तात्काळ संपर्क साधण्याचे करण्याचे अवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. सायबर गुन्हयांविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीकोनातुन तयार करण्यात आलेली पत्रके सर्व विदयार्थांना वाटुन जनजागृती करण्यात आली.पोलीस आणि पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली व महिलांची या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या.
पोलीस निरीक्षक यादव यांचे सोबतच सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलीस जवान राजेंद्र गर्गे गजेंद्र पांढरकर गणेश धोत्रे योगेश भिंगारदिवे अमोल झाडबुके यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी साबळे सर, भालेराव सर, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल चाँद सुलताना विदयालयाचे पठाण सर,अकिल सर, प्रगत कला महाविदयालयाचे गाडगे, श्रीमती भोरे, सरोदे, देशपांडे, गाजुल, ठुबे व सौ कुलकर्णी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

——-
शाळकरी,महाविद्यालयीन मुलींना आपल्या स्वसंरक्षणासाठी उपलब्ध असलेली पोलीस यंत्रणा, महिलांविषयी असलेले कायदे, विविध कलमे आदींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र भीतीपोटी व कायद्याच्या अज्ञानामुळे मुली व महिला निमूटपणे अन्याय सहन करतात. अशा महिला-मुलींना निर्भय बनवण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला आहे.
*- चंद्रशेखर यादव, पो. नि. कोतवाली पोलीस स्टेशन*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे