धुक्यात हरवली पहाटेची वाट.
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
धुक्यात हरवली पहाटेची वाट….! रविवारी सकाळी पहाटे धुक्याने प्रवरा परिसराला व्यापलेले चित्र पाहावयास मिळाले.
विजय बोडखे
राजुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल असे काहीसे दृश्य रविवारी सकाळी प्रवरा परिसरातील अनेक भागात पाहावयास मिळाले आहे. राहता तालुक्यातील प्रवरा परिसरात रविवारी पहाटे धुक्याने पूर्ण परिसर व्यापलेला दिसला या पडलेल्या धुक्यामुळे प्रवरा परिसरातील श्रीरामपूर रोड लोणी रोड नगर मनमाड रोड यासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये धुक्याने पूर्ण दुकेमय वातावरण सकाळी पार्टी उडणाऱ्या शेतकरी शेतमजुरांना पहावयास मिळाले या धुक्यातून कशीबशी वाट काढताना अनेक नागरिकांसह रोडवरून जाणाऱ्या चार चाकी वाहनधारकांना आपल्या गाडीचे लाईट लावून जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत होते तर काही चार चाकी वाहनांनी आपल्या गाड्या रोडच्या कडेला लावून थांबणे पसंत केले होते कारण की दाट पडलेल्या धुक्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत धुके असल्यामुळे अनेकांना या धुक्यामुळे आपले दैनंदिन कामकाज करता आले नाही. सकाळी नऊ नंतर थोड्याफार प्रमाणात धुके मावळल्यामुळे अनेकांनी आपापल्या कामाला सुरुवात केली. एकूणच गेल्या आठ दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारवा तयार झाला असला तरी पाऊस कधी पडेल हे मात्र सांगता येत नाही. या दाट पडलेल्या धुक्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण दिसन येत असून हरभरा गहू कांदे अशा पिकावर या धुक्यामुळे रोगराई होऊ शकते त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या तरी चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. दात दुखी पडल्यामुळे पाऊस जातो अशी जी म्हण आहे ती आता खरी होते की काय हेच पहावे लागेल हे मात्र नक्की आहे. फोटो रविवारी पहाटे पडलेल्या धुक्यामुळे प्रवरा परिसरातील अनेक गावांमध्ये पडलेल्या दाट धुक्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले
(छायाचित्र विजय बोडखे राजुरी)