पंजाब आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
शिर्डी ( सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
पंजाब आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार मा. श्री. राघव चढ्ढा यांनी गुरुवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.
पंजाब आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार मा. श्री. राघव चढ्ढा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी शाल व श्री साईसतचरीत्र ग्रंथ भेट देवुन त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ आणि त्यांच्या समवेत असणारे त्यांचे सुरक्षारक्षक तसेच संस्थांनचे सुरक्षारक्षक ही उपस्थित होते. खासदार राघव चढ्ढा हे निस्सीम साईभक्त असून ते नेहमी शिर्डीला साई दर्शनसाठी येत असतात.