आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त ॠतुजा भोसलेचे राहुरीकरांच्या वतीने अभिनंदन
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहुरी (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस मध्ये ऋतुजा भोसले हिने सुवर्णं पदक मिळवून देशाचे नांव जगात उज्वल केले त्याबद्दल तिचे राहुरी शहर व तालुक्याचे वतीने अभिनंदन करून तिला भावी कार्यासाठी शुभेच्छा राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे यांनी व्यक्त केले.
सुवर्णंकन्या ऋतुजा भोसले हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस ह्या स्पर्धेत रोहन बोपन्ना यांचे बरोबर मिश्र दुहेरी मध्ये सुवर्णं पदक मिळविले म्हणून तिचा येथील प्रजपिता विश्व विद्यालयाच्या राहुरी शाळेच्या वतीने सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी डॉ. तनपुरे बोलत होत्या. यावेळी ऋतुजाचे वडील डीवायएसपी (नगर )संपतराव भोसले पती स्वप्नील गुगळे,आई निता नंदा दीदी, ख़ुशी दीदी व संगीता हारदे अप्पासाहेब ढुस, शिवाजी डोले आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ तनपुरे म्हणाल्या की ऋतुजा ही श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील एक खेळाडू देश पातळीवरील स्पर्धेत खेळून देशाचे नांव जगात नेवून ठेवले असून तिला यापुढील काळात असेच यश मिळो अशी इच्छा राहुरी तालुक्याचे दिल्या.
यावेळी नंदा दीदी ह्यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या की भारताची सुवर्णं कन्या ऋतुजा भोसले हिने आपल्या देशाचे नांव जगात उज्वल केले अश्या सुवर्णंकन्येचा नवरात्रौत्सवात सत्कार करण्याचा मान दिला त्याबद्दल तिच्या परिवाराचे खूप आभार मानून त्या म्हणाल्या की ऋतुजा हिचे व्यक्तिमत्व फार मोठे आहे तिचे करावे तेवढे कौतुक कमीच असून ही विश्व रुपी, विश्व कल्याणकारी कन्या असून आज तिला कितीही उपमा दिल्या तरी कमीच आहे.
सत्कारास उत्तर देताना सुवर्णंकन्या ऋतुजा भोसले म्हणाली की माझ्या यशा मध्ये माझे आई वडील यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी मला जे या खेळात प्रोत्साहन दिले म्हणूनच मी हा दिवस पाहत आहे.अनेक वर्षाच्या कष्टाचे फळ मला मिळाले असून मी ५० टक्के यश संपादन केले असून अजून ५० टक्के यशासाठी प्रयत्न करायचे आहे त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छाची गरज आहे.प्रजपिता विश्व विद्यालयात माझ्या जो सत्कार करण्यात आला तो मला भविष्यात प्रेरणा देणारा आहे.
यावेळी मुकुंद गडढे सर,डिवायएसपी संपतराव भोसले आई निता भोसले व पती स्वप्नील ह्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गीता दिदी, मंगल दिदी, ज्योती दिदि, संदिप गाडेकर,रवींद्र अरगडे सर विद्या चव्हाण,सुनील देशपांडे,विकास सरोदे,विकास तारडे,किशोर झिने सोनाली तनपुरे मॅडम,आदि उपस्थित होते.