प्रसिद्ध सिने अभिनेते सचिन खेडकर यांनी सपत्नीक शिर्डीत घेतले साई दर्शन!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राजकुमार गडकरी
(डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
शिर्डी( प्रतिनिधी) प्रसिद्ध सिने अभिनेते सचिन खेडकर यांनी सपत्नीक शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
सिने अभिनेते सचिन खेडकर हे साईभक्त असून त्यांनी रविवारी सपत्नीक शिर्डीला येऊन श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थांनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.
सिने अभिनेते सचिन खेडकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साई संस्थांनच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी संस्थांनचे काही अधिकारीही व कर्मचारी उपस्थित होते. सिने अभिनेते सचिन खेडकर शिर्डीत आल्याचे समजताच साईभक्त व त्यांच्या चहात्यांनी त्यांना पाहण्यासाठी संस्थान परिसरा बाहेर गर्दी केली होती.