लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांची निवड
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (प्रतिनिधी:)
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची एक हाती सत्ता असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगावभाग संचालकपदी मुरकुटे यांचे खंदे समर्थक टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना कारेगाव भाग संचालकपदी निवडीचे पत्र वितरित करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, सौ.मंजूश्रीताई मुरकुटे, बी. आर. एस. चे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, अशोकचे मा. चेअरमन ज्ञानदेव साळुंके,श्रीरामपूर लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोकचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, मा. व्हा चेअरमन दत्तात्रय नाईक, मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले, सरपंच अर्चनाताई रणनवरे, ग्रा.स. भाऊसाहेब पटारे, सुनील बोडखे, मा. उपसरपंच पाराजी पटारे, मल्हार रणवरे,अशोक उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे सर्व मंडळ, ग्रामपंचायतचे सदस्य गावातील सर्व पदाधिकारी या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.