0
9
1
3
8
3
सत्तेचा महासंग्रामऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राजुरी( प्रतिनिधी)
सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे
अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांना नुकताच सह्याद्री गौरव पुरस्कार 2023 देऊन गौरविण्यात आले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या माध्यमातून प्रमोददादा मोरे हे वृक्षलागवड व संवर्धन यासाठी महत्वाचे योगदान देत असल्याने आदिवासी सेवा संघ,मुंबई यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला असून अकोले तालुक्यातील भोजनेवाडी येथे नुकतेच संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ भोजने यांच्या हस्ते हा पुरस्कार सुपूर्त करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या अध्यक्षा हेमलताताई पिचड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी व्यासपीठावर दिनेश परमार,सुरेशभाई मेहता,चंद्रकांत भोजने,सरपंच यमुना घनकुटे,सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ शिंदे यांच्यासह निसर्ग व समाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्यसंघटक वृषाली कडलग, राज्यसंघटक राम वाकचौरे,राज्यकार्यकारिणी सदस्य सुधाकर शेटे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य शोभा लांडगे तसेच राज्यप्रसिद्धी प्रमुख रमेश खरबस आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष रामनाथ भोजने म्हणाले की,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक घडी सुरळीत ठेवण्याचे विधायक काम अनेक सामाजिक संघटना,व्यक्ती करत आहेत त्यांचा आमच्या आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून पुरस्कार देऊन गौरव केला जातो त्यांना आणखी प्रेरणा दिली जाते. त्यातच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या माध्यमातून प्रमोददादा मोरे हे वृक्षलागवड व संवर्धन यासाठी महत्वाचे योगदान देत आहेत यामुळे त्यांना सह्याद्री गौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे भोजने यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रमोददादा मोरे म्हणाले की, हा पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच प्रेरणा वाढविणारा आहे.जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे ,वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त स्व.आबासाहेब मोरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचे हे काम पुढे नेटाने सुरु आहे यासाठी मला मंडळाचे महाराष्ट्रातील माझे सर्व पदाधिकारी,सहकारी सहकार्य करत आहेत.सर्वांच्या मदतीने हे वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम सुरु आहे अशी भावना मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख रमेश खरबस यांनी वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी माहिती देताना मंडळाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा हेमलताताई पिचड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दोन्हीही संस्थांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.समाजहिताच्या कार्यक्रमासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने सहभाग द्यायला हवा असे आवाहन यावेळी पिचड यांनी बोलताना केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा संघटक चंद्रकांत भोजने यांनी केले.दरम्यान भोजनेवाडी या परिसरात वृक्ष लागगवड केली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
9
1
3
8
3