उंबरेतील घटना निंदणीय पण त्यातून सर्वसामान्यांना त्रास झाल्यास विधानसभेत आवाज उठवेल- आ. तनपुरे
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
प्रतिनिधी
राहुरी : उंबरे येथील घडलेली घटना ही अतिशय निंदणीय आहे त्यामुळे सदर घटनेची सखोल चौकशी करून त्याची पाळेमुळे शोधून काढून संबंधितांवर कडकात कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. कुठल्याही प्रकारची विनाकारण कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला किंवा कुठल्याही घटनेत सर्वसामान्यांना त्रास झाला तर अधिवेशनात आवाज उठवेल असा इशारा देखील यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दोन समाजात तणाव निर्माण झाला होता त्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शांतता बैठकीचे आयोजन केले होते यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी येथे नागरिकांशी संवाद साधला व पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.प्रसंगी तनपुरे म्हणाले की येथील कुठल्याही हिंदू बांधवांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी सदर घटनेतील आरोपींवर कठोरात-कठोर कारवाई करावी. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का नाही असा देखील प्रश्न तनपुरेंनी उपस्थित केला. अनेक पालकांनी आपल्या मुली शाळेतून काढून घेतल्या हे दुर्दैव आहे आणि ते पोलीस प्रशासनाचे अपयश असल्याचे देखील तनपुरे यांनी म्हटले त्यामुळे असली वेळ भविष्यात येऊ नये अन्यथा आम्ही लक्ष घालू असे देखील यावेळी आमदार प्राजक्त म्हटले आहे.
प्रसंगी डिवाएसपी बसवराज शिवपुंजे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अदिनाथ महाराज दुशिंग, सरपंच सुरेश साबळे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड, सुनिल आडसुरे, राजेंद्र बानकर, नवनाथ ढोकणे,मच्छिंद्र सोनवने ,गोरक्षनाथ दुशिंग बाळासाहेब उंडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.: