जो दुसऱ्याला उद्योग देतो त्याला उद्योजक म्हणतात-…. बाबासाहेब (भाऊ) चिडे
टाकळीभान – प्रतिनिधी – जो दुसऱ्याला उद्योग देतो त्यालाच उद्योजक म्हणतात,मी गरीब कुटुंबात जन्माला आलो म्हणून खचून न जाता त्यावर मात करून परिस्थितीशी लढायला शिका, तेव्हाच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाॅल, असे प्रतिपादन लक्ष्मी उद्योग समूहाचे चेअरमन व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व गोदा धाम सरला बेटचे विश्वस्त मा, बाबासाहेब चिडे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे ज्युनिअर कॉलेज टाकळीभान येथे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 जयंती महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी मंजाबापू थोरात होते.
याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे (आप्पा ), पोपटराव पवार,सुहास राठोड, दीपक त्रिभुवन जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे लक्ष्मणराव कदम गुरुजी, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष राहुल पटारे, अमोल पटारे, पाराजी पटारे, सतीश आसने, बोर्डे सर, जॉन रणनवरे,भाजपाचे बंडू हापसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी. टी. इंगळे यांनी केले तर शाखेचे अहवाल वाचन पर्यवेक्षक एम के बनसोडे यांनी केले.
पुढे बोलताना चिडे म्हणाले की, मी एक गरीब कुटुंबात जन्माला आलेला मुलगा असून मी माझ्या शालेय जीवनात खूप कष्ट भोगले आहेत. मी सातवीत असताना बटर पाव विकले, तसेच कपबशीच्या कंपनीमध्ये काम केले एवढेच नव्हे तर रेल्वेच्या माल धक्क्यावर मी व जेष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे आम्ही दोघांनी 30 रुपये रोजाने काम करून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला माझी उद्योजकाची सुरुवात चाळीस रुपये रोजंदारीवर एक गाय खरेदी करून त्या गायीच्या जीवावर मी दूध व्यवसायाला सुरुवात केली व मी आज उद्योजक बनलो उद्योजक म्हणजे जो दुसरा उद्योग देतो त्यालाच उद्योजक म्हणतात. म्हणून तुमची परिस्थिती कितीही गरिबीची असू द्या आपण खचून न जाता त्या परिस्थितीवर कशी मात करता येईल आपण चांगल्या भावनेने व ध्येयशी एकनिष्ठ असाल तर यश आपोआप तुमच्या मागे धावून येईल असे सांगून शाळेची स्थानिक स्कूल कमिटी चांगली असेल तेव्हाच शाळा नावारूपाला येते म्हणून न्यू इंग्लिश स्कूल शाळेने माझा वाढदिवस साजरा करून येथोचित सत्कार केला त्या सत्काराने मी भारावून गेलो आहे शाळेस काही अडचण आल्यास मी केव्हाही मदत करण्याचा प्रयत्न करीन
तसेच साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे म्हणाले की कर्मवीर भाऊराव पाटलांनी अतिशय कष्टातून बहुजन समाजाला शिक्षण मिळवून रयत शिक्षण संस्था उभी केली सर्वसामान्य साठी शाळेचे व्यासपीठ खुले केले म्हणून आज बहुजनांची मुले उच्च पदावर शिक्षण घेताना दिसत आहेत हे उपकार केवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आहे. शाळेने माझ्यासाठी काही सूचना केल्यास त्या सूचनाचे पालन करून काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करीन
याप्रसंगी सुहास राठोड, दीपक त्रिभुवन माजी सरपंच मंजा बापू थोरात, जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राहुल पटारे, पोपटराव पवार, बोर्डे सर, आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते सुहास राठोड यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले दीपक भाऊ त्रिभुवन यांच्या वतीने ही शालेय विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ओम पाचपिंड व प्राध्यापिका वैजयंती सोनवणे यांनी केले.