मुस्लिम कुटुंबाच्या घरी रगणार गाईच्या डोळ्याचा सोहळा
टाकळीभान (प्रतिनिधी)
– एकीकडे राज्यात गोवंश हत्याबंदी , हिंदू – मुस्लिम धार्मिक तेढ असे वातावरण असताना टाकळीभान ,ता .श्रीरामपूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज हुसेन शेख त्यांच्या कुटुंबाने त्यांना आंदण ( दान स्वरूपात ) म्हणून आलेल्या गावरान देशी गाईचा भव्य असा डोहाळे जेवण सोहळा गुरुवार दि .26 सप्टेंबर रोजी आयोजित करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे .
टाकळीभान येथील नवाज हुसेन शेख व त्यांचे कुटुंबात गेल्या तीन पिढ्यांपासून ६७ वर्षांपासून गोधन पाळले जाते . आता ज्या गौरी गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे ती गाय त्यांना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने आंदण ( दान ) म्हणून दिलेली आहे .शेख कुटुंबाने या गौरी गायीचा कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला असून या गौरीचा शेख कुटुंबातील लहानांपासून – थोरांपर्यंत लळा लागलेला आहे . आणि आता तिच गौरी गाय गाभण असल्याने तिचा भव्य दिव्य असा डोहाळे जेवण समारंभ ठेवून तब्बल 1000 लोकांचे दाळ बट्टी जेवणाचे नियोजन केलेले आहे .
यावेळी माहिती देताना नवाज शेख यांनी सांगितले कि आमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय दूध धंदा असून आमचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो .त्यामुळे आजोबांपासून आतापर्यंत दारात गोधन आहे .गोमातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा सोहळा ठेवला आहे .