सर्व थरातील विद्यार्थी व सर्व व्यापक दृष्टीने शिक्षण देणारी रयत शिक्षण संस्था एकमेव असल्यामुळेच या संस्थेचे नाव देशाबरोबरच विदेशातही— रयत बँकेचे व्हा. चेअरमन दिलीपराव डहाळे
शिर्डी (प्रतिनिधी) सर्व थरातील विद्यार्थ्यांना व्यापक दृष्टीने शिक्षण देणारी रयत शिक्षण संस्था ही देशात सर्वोच्च शिक्षण संस्था असून रयत शिक्षण संस्थेचे नाव राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही झाले आहे. असे प्रतिपादन रयत बँक साताराचे व्हा. चेअरमन दिलीपराव डहाळे यांनी केले.राहाता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बु.येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे होते.या कार्यक्रमाला सरपंच परिषदेचे राज्यअध्यक्ष दत्तात्रय पा. शेटे उद्योजक विजयराव कडू ,सरपंच ओमेश जपे ,उपसरपंच विकास जपे, कृ. उ. बा. समितीचे संचालक शांताराम जपे , राजेंद्र आगलावे, गणेश कापसे, मुख्याध्यापक तुपे एस एम, संगीताताई वाघमारे , राजकुमार गडकरी, कैलास सदाफळ, गणेश आगलावे, नवनाथ जपे, सतीश जपे, पद्माताई कापसे, रावसाहेब आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम डॉ. कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढली. नंतर प्रतिमापूजन व मान्यवरांचा सत्कार झाला.या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी व विविध मैदानी स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विजयी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय पा. शेटे यांनी या विद्यालय परिसरात प्लेविन ब्लॉक बसवण्यासाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली. सतीश जपे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीसे जाहीर केली.
यावेळी डहाळे पुढे म्हणाले की, डॉ.कर्मवीर अण्णांनी यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत शाळा काढल्या. त्यांच्या योगदानामुळेच आज 750 शाळा, १४००० शिक्षक,साडेचार लाख विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या संस्थेत कोणतेही डोनेशन नाही. प्रतिकूल ठिकाणीही शाळा आहेत. शाळा हाय फाय म्हणजे शिक्षण हाय फाय असे नाही.असे सांगत शिक्षणामध्ये परिस्थिती आड येता कामा नये. परिस्थितीमुळे शिक्षण होतेच असे नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अण्णांनी शिक्षणाबरोबरच संस्कृती जपण्याचे ही काम केले. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद तसेच कमवा व शिका या योजना आपल्या शाळांमध्ये चालू केल्या. हे कर्मवीरांचं स्वप्न होतं. त्यामुळेच आज रयत शिक्षण संस्थेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग अशा आर्थिक कमाई करून देणारे 15 कोर्स येत आहेत. लिखाण ,वाचन याप्रमाणेच कृतीतून शिक्षण हे अण्णांचे स्वप्न होते. ते या शिक्षण संस्थेमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे विद्यार्थी येथे कृतीतून शिक्षण घेत आर्थिक कमाई करू शकतील. व त्यावरच शिक्षण होऊ शकेल. असा या शिक्षण संस्थेचा प्रयत्न आहे. असे सांगत रयत शिक्षण संस्था एक विद्यापीठ झाली आहे. व यापुढे या रयतेच्या विद्यापीठातूनच विद्यार्थी पदवीधर होणार आहे. असे म्हटले. या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाला वॉल कंपाउंड साठी रयत बँकेकडून आपण प्रस्ताव द्या त्यासाठी पाच लाख रुपये देऊ, असे आश्वासनही यावेळी दिलीपराव डहाळे सर यांनी दिले.यावेळी श्रीराम इंडस्ट्रीजचे उद्योजक विजयराव कडू पा. यांनी नवीन डायस देण्याचे यावेळी जाहीर केले. बाळासाहेब जपे, कु. भक्ती तुरकणे, आदींची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डुंबरे आभार भारत खेडकर यांनी मानले.या कार्यक्रमाला एकनाथ आरणे, रफिक शेख, कारभारी पाचोरे, दिग्विजय कापसे, आदींसह मुख्याध्यापक तुपे एस एम ,ज्येष्ठ शिक्षक डुंबरे, म्हस्के , काळेगोरे, खेडकर,सौ कानडे मॅडम, श्री खान ,वाकचौरे, शिंदे मॅडम व सर्व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.