Breaking
आरोग्य व शिक्षण

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत साजरा केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! लक्ष्मीवाडी जि. प. प्राथ.शाळेत प्रत्येक चिमुकल्या विद्यार्थ्यांचा त्या त्या दिवशी वाढदिवस होतो साजरा!

0 9 1 3 9 4

 

शिर्डी (राजकुमार गडकरी)

घंटा वाजली !शाळा भरली! प्रार्थना झाली !मात्र सर्वांचे लक्ष लागून होते ते शाळेतील आपल्या चिमुकल्या चार मित्रांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे!

राहाता तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील आयुष ,आराध्या आयुष, व साहिबहुसेन या चार चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आज शनिवारी वाढदिवस होता. वर्गातील व शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये या वाढदिवसाची मोठी चर्चा रंगत होती. व कुजबुजही दिसून येत होती.चिमुकले विद्यार्थी किंवा लहान मुले म्हटले की वाढदिवस हा त्यांचा मोठा आनंदाचा, आवडीचा विषय ! मग ते घर असो किंवा शाळा असो, वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे हेच मन ओळखून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी येथील शिक्षकांनी शाळा भरताना प्रार्थनेच्या वेळी शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असतो.तो शाळेत साजरा केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक आनंद मिळतो. त्यांच्या निरागस अशा चेहऱ्यावर समाधान दिसून येते व शाळेत येण्याची एक आवड त्यामुळे आपोआप मनी निर्माण होते. आपल्या घरी आपले आई-वडील भाऊ बहीण कुटुंबातील सदस्य वाढदिवस साजरा करतात .तसेच शाळेतही आपला वाढदिवस हे कुटुंबाप्रमाणे, घराप्रमाणे साजरा केला जातो. त्यामुळे एक चिमुकल्या या विद्यार्थ्यांच्या मनात आपलेपणाची भावना लहानपणापासूनच मनामध्ये ठसते. व शाळेतील प्रार्थने प्रमाणे भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत हे प्रार्थनेतील वाक्य खरोखर त्यामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात ठाम रुजले जाते. म्हणूनच या चार चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आज शाळेत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर एका टेबलावर फुगे व सजावट करून या चार मुलांना उभे करून त्यांच्यासमोर केक ठेवून ,केक कापण्यात आला व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले. मात्र हा छोटा खानी वाढदिवस शाळेतील चिमुकल्यांना मोठा आनंददायी व एक बंधुत्वाची मोठी दिशा या लहान वयात देऊन गेला. वाढदिवसानिमित्त चॉकलेट मिळाले मात्र हे चॉकलेट या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठे गिफ्ट होते. एक आपलेपणाची ,आपुलकीची, घराप्रमाणे शाळेतील प्रेमाची, माणुसकीची त्यातून मायेची झालर दिसून येत होती. हे विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरून आनंदावरून यावेळी दिसून येत होते. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी मुख्याध्यापक श्री चव्हाण सर तसेच श्री बारसे सर, श्रीमती खांडगे मॅडम, श्रीमती पाचरकर मॅडम, श्री गर्जे सर ,

श्री खरात सर श्री सेंदनशिव सर श्रीमती भांगरे मॅडम, श्री भांगरे सर, सातदिवे सर आदींनी प्रयत्न केले. व शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस यापुढेही शाळेत साजरी करू !त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक हसू व आनंद दिसून येतो. असे यावेळी मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे