आजी-आजोबा मेळावा यंशवतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे उत्साहात संपन्न !
विजय बोडखे
राजुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात आजी-आजोबा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते . राहता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण प्राथमिक माध्यमिक विद्यालय राजुरी येथे आजी आजोबा स्नेह मेळावा मोठ्या उत्सवात संपन्न झाला
सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यालयात आजी आजोबा स्नेह मेळावा उत्सवात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्थूल कमिटीचे अध्यक्ष मारुती गोरे होते विद्यालयाचे प्राचार्य मुस्ताक शेख यांनी प्रास्ताविक केले . आजी आजोबा व नातू हे संस्काराचे केंद्र आहे विद्यार्थ्यावर उत्तम संस्कार मिळतात असे सांगितले याप्रसंगी राजुरी गावचे उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे ,स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष रामजी लाळगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते
प्रारंभी आजी आजोबांना औक्षण करून लेझीम पथकाचे स्वागत करण्यात आले यावेळी आजी आजोबांनीयांच्यासाठी विविध स्पर्धा सेल्फी पॉइंटचा आनंद घेतला यानंतर विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले आजी आजोबांनी या मेळाव्याबद्दल आनंद व्यक्त करून दरवर्षी ह्या मेळव्याचे आयोजन करावे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव गोरे तुकाराम गोरे हौशीराम गोरे सूर्यभान रोकडे , सोसायटीचे व्हा चेअरमन सुधीर गोरे आर डी कदम यांच्यासह गावातील आजी आजोबा मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धावणे सर व कल्पना नेहे यांनी केले तर
कार्यक्रमाचे नियोजन सौ कोकणे मॅडम यांनी केले पर्यवेक्षक भांगरे सर , सौ दिवे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे व गावकऱ्यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य मुस्ताक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब घोरपडे ,एकनाथ राऊत सुनील आढाव , शेंडगे सर सातकर सर सौ नेहे मॅडम सौ त्रिवेणी धूळसेंदर सुनीता कदम सौ रोकडे मॅडम सो सुनीता पवार प्रदीप मगर श्रीमती वैशाली साबळे श्रीमती बांद्रे मॅडम आदितीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले . फोटो राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात आजी आजोबा मेळावा मोठा उत्साहात संपन्न झाला यावेळी घेतलेलं आहे
(बातमीचे छायाचित्रछाया संतोष गोरे राजुरी)