शिर्डी येथे एका दानशूर साईभक्ताकडून सुमारे 12 लाख 70 हजार रुपये किमंतीचा सुवर्ण हिरेजडित मुकुट साईचरणी अर्पण!
शिर्डी ( प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे व श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या सद्गुरु श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच येथे दररोज हजारो व उत्सवाच्या वेळी लाखोच्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे श्रद्धेपोटी साईभक्त साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. श्री साई चरणी सोन्या, चांदी, हिरे ,पाचू, रोख रक्कम अशा अनेक वस्तू , रोख रक्कम देणगी स्वरूपात अर्पण करत असतात .अशा दानशूर व्यक्ती पैकीच एका दानशूर साईभक्ताने आज रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले व साईचरणी ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट अर्पण केला.अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
या मुकूटाची किंमत अंदाजे १२ लाख ७० हजार रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण हिरे जडीत मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आला. साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्ताने संस्थानला आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. साईबाबांच्या चरणी अनेक सोन्याचे मुकुट देणगी स्वरूपात यापूर्वीही आले आहेत .त्यामध्ये आणखीन एक हा सोनेरी सुंदर मुकुट आज देणगी रूपाने वाढला आहे. या दानशूर साई भक्ताचे साई संस्थान, साईभक्त, ग्रामस्थ यांच्याकडून मनोमन कौतुक होत आहे. अभिनंदन होत आहे.