राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत घेतले श्री साईबाबांचे दर्शन!
शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. शिर्डीत एका कार्यक्रमानिमित्त ते आले असताना त्यांनी श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री, तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते. श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल श्री साई मूर्ती देऊन केला. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री, तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.