शिर्डीत पाच दिवसीय मोफत कृतिम जयपूर फूट शिबिराचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन उत्साहात संपन्न!
शिर्डी ( प्रतिनिधी)श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी, रुरल इलेक्ट्रीफिकेशन कार्पोरेशन लिमीटेड व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीर व गरजु दिव्यांगासाठी साहित्य वाटप दिनांक दि. २६/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४ या दरम्यान श्री. साईनाथ रुग्णालय (२०० रुम) येथे आयोजीत करणेत आलेले आहे. सदरील शिबीराचे उद्घाटन गुरुवारी श्री. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से यांचे अध्यक्षतेखाली श्री साईनाथ रुग्णालय (२०० रुम) येथे नुकताच पार पडला. सदर शिबीराचे वेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सदरील जयपुर फुट शिबीराचा लाभ घेवुन सर्व दिव्यांग बांधवानी तुमच्यावर निसर्गाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात मार्गक्रमण करा. हे शिबीर दिव्यांग बांधवांसाठी लाभकारक ठरणार असुन सर्व दिव्यांग बांधवाना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. यातुन त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास आनंद हा नक्कीच त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणारा असेल. श्री साईबाबांचे रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा या शिकवणीनुसारच गरीब व गरजु रुग्ण, दिव्यांग यांचेकरीता श्री साईबाबा संस्थानमार्फत विविध शिबीर नेहमी आयोजीत करत राहणार आहे. शिबीराकरीता सुमारे ७१० दिव्यांग बांधवानी नोंदणी केलेली असुन अजुन नोंदणी सुरु आहे.
यावेळी श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे श्री नारायणजी व्यास व त्यांची संपुर्ण टिम व ओम साईराम मित्र मंडळ बिडकीन ता. पैठण यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक, लेफ्ट कर्नल शैलेश ओक प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र. वैद्यकीय अधीक्षक, डॉ. मैथिली पितांबरे प्र. अधीसेविका, नजमा सय्यद जनसंपर्क अधिकारी, सुरेश टोलमारे यांच्यासह श्री. साईनाथ रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. शिबीर यशस्वी व्हावे यासाठी श्री साईनाथ रुग्णालयातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, श्री. प्रसन्न धुमाळ यांनी केले तर प्रस्तावीक, डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री साईबाबा संस्थान रुग्णालयांचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले.