दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन!
शिर्डी (प्रतिनिधी)
दिल्ली राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व कर्जत-जामखेड चे आमदार श्री रोहित पवार यांनी आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डीत येवून श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीप भोसले यांनी त्यांचा साई डायरी व शाल देऊन सत्कार केला .यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. तसेच संदीप वर्पे, महिंद्र शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर देशात मोठी चर्चा सुरू होती .त्यानंतर अतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री झाल्या. उपमुख्यमंत्री अरविंद सिसोदिया यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळते की काय अशीही चर्चा होती. मात्र ते उपमुख्यमंत्रीपदी कायम राहिले.