साईयोग फाउंडेशन द्वारे शिवजयंती उत्साहात साजरी
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी यांचा ,”शिवजन्मोत्सव सोहळा” साईयोग फाउंडेशन द्वारे साजरा करण्यात आला.सुरुवातीला साईयोग फाउंडेशनचे जेष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकरते दशरथ तुपे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत सर्वांचे स्वागत केले व प्रस्तावना केली.राहाता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पटारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बालाशिवशाहीर धनराज शेटे याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसणारे शिवा काशिद यांनी शिवाजी महाराजाची पन्हाळ गडावरून सुटका करण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली तो प्रसंग हुबेहूब आपल्या रोमांचकारी व्याख्यानातून उभा केला.कु.श्रद्धा धाडीवाल हीने शिवाजी महाराजांची सुरेख रांगोळी रेखाटली.या दोघांचा सत्कार बी.डी.ओ.जालिंदर पटारे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच जालिंदर पटारे यांचाही साईयोग फाउंडेशन द्वारे सत्कार करण्यात आला.
जालिंदर पटारे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना शुभेच्छा देत साईयोग फाउंडेशनच्या आजच्या उपक्रमाचे कौतुक केले.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.शेवटी साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी पत्रकार राजुभाई पठाण,ॲड.गोरख दंडवते, ॲड.दत्तात्रय धनवटे,ज्ञानेश्वर शेटे,मधुकर बोठे,सुनील धाडीवाल,भाऊसाहेब बनकर,विलास वाळेकर,संजय बाबर,मोहन तांबे,भारत दवंगे,संजय वाघमारे,दिपक दंडवते नामदेव गवते,सिताराम बावके,उमेश लुटे,राजू वायकर,अनिल सातव व्यंकटेश अहिरे,अंकुश गांधी,विठ्ठल निर्मळ,राजेंद्र फंड,राजेंद्र बांगर,संदिप जेजुरकर,सुरज गायकर,पंकज शिंदे,अक्षय सदाफळ,सागर बोठे,प्रणित भालेराव,बाळासाहेब तारगे,प्रणव लावर,सुनिल मोकळ,संजय गोयर,योगेश वैराळ,रवी निकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.