शिर्डीत श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने शिर्डी साई लक्ष्मी यज्ञ रौप्यमहोत्सव (२५वेवर्ष) सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
अयोध्या येथील राममंदिराचे उद्घाटन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी उपस्थित सर्व साईभक्तांकडून संकल्प
शिर्डी..(सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबले
साईबाबांच्या पावनभूमीत सालाबादप्रमाने यंदा ही शिर्डी येथील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती शैलजामाँ शिंदे- गायकवाड.यांच्या प्रेरणेने मकर संक्रांती च्या शुभ मुहूर्तावर २५ वा शिर्डी साई-लक्ष्मी यज्ञ मोठ्या भक्तीभावात पार पडला. गेल्या २४ वर्षा पासुन हा सोहळा अविरतपणे सुरु असुन यंदाचे हे २५ वे वर्ष आहे.दरवर्षी या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. या वर्षी 75 जोडपे यज्ञ सोहळ्यात सहभागी झाले होते.
श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन बाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या दिव्य 9 नाण्यांची मिरवणूक काढण्यात आली.
श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट, शिर्डी चे विश्वस्त
श्री.अरुणराव शिंदे-गायकवाड .व तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी पोलीस स्टेशन चे श्री. संदिपजी मिटके साहेब यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून श्री मिटके साहेब यांनी सहपत्नीक सहभाग घेतला. या यज्ञ पूर्णाहुती सोहळ्यासाठी साईभक्त बायजामाँ कोते यांचे वंशज मा. श्री.निलेशराव कोते , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव मा.श्री. राकेश कोते , राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष मा. श्री महेंद्र शेळके .,श्री खंडोबा मंदिर ट्रस्ट शिर्डी चे अध्यक्ष श्री. संदिप नागरे , भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम ट्रस्ट शिर्डी चे अध्यक्ष श्री. मेहमूद सय्यद अब्दुल, श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री. राजतिलक बागवे साहेब,श्री साईबाबा संस्थानचे लेखाधिकारी श्री. अविनाश कुलकर्णी साहेब आदि.मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष श्री.अरुणराव शिंदे- गायकवाड . सौ. संगीता गायकवाड साई 9 ग्रुप चे संचालक श्री. साईराज गायकवाड ., सौ.स्नेहल गायकवाड यशराज गायकवाड . यांच्या हस्ते आलेल्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून गायकवाड परिवारातर्फे हा अभुतपूर्व यज्ञ सोहळा अखंडपणे सुरू असून, यानिमित्ताने श्री साईबाबांनी द्वारकामाई मध्ये यज्ञ रुपी अखंड धुणी प्रज्वलित केलेल्या धुनिचा प्रचार प्रसार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे
साईबाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना समाधि घेते वेळेस चांदीची नऊ नाणे दिलेले आहेत.त्याची जपवणूक गायकवाड परिवाराने आजतागायत केलेली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी हा यज्ञ सोहळा आयोजित करण्यात येत असतो यासाठी मोठ्या प्रमाणावर साईभक्त यज्ञविधी साठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर उपस्थितीत मान्यवरांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात साईनामाच्या जयघोषात आज हा सोहळा संपन्न झाला व अयोध्या राममंदिराचे उद्घाटन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी उपस्थित सर्व साईभक्तांकडून संकल्प करण्यात आला.