भारताचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती डॉ. धनंजय वाय. चंद्रचूड यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले श्री.साईबाबांचे दर्शन
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राजकुमार गडकरी
(डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
शिर्डी (प्रतिनिधी) भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा.न्यायमुर्ती डॉ. धनंजय वाय. चंद्रचुड, यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधिश मा.श्री.सुधाकर यार्लगड्डा व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.पी.शिवा शंकर, अतुल कु-हेकर (सेक्रेटरी जनरल), श्री राकेश कुमार, रजिस्ट्रार, मा. सर्वोच्च न्यायालय, आर. एन. जोशी जनरल रजिस्ट्रार, मुंबई उच्च न्यायालय व श्रीमती. अनुजा अरोरा आदी उपस्थित होते.
मा.न्यायमुर्ती डॉ. धनंजय वाय. चंद्रचुड, (भारताचे सरन्यायाधिश सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली) यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साई संस्थानच्या वतीने संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधिश मा.श्री.सुधाकर यार्लगड्डा व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.पी.शिवा शंकर यांनी त्यांचा श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी अतुल कु-हेकर (सेक्रेटरी जनरल), राकेश कुमार, रजिस्ट्रार, मा. सर्वोच्च न्यायालय, आर. एन. जोशी जनरल रजिस्ट्रार मुंबई उच्च न्यायालय व श्रीमती. अनुजा अरोरा आदी उपस्थित होते.