धनगरवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहाता (प्रतिनिधी -) ज्ञानेश्वर जोरे
राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथ.व उच्च प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन तसेच मेरी माटी मेरा देश अभियान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेतून प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय धनगरवाडी येथे विस्तार अधिकारी (पंचायत ) तथा प्रशासक श्री.शंकर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर सर्व ग्रामस्थ जि.प.शाळेच्या प्रांगणात उपस्थित झाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडीचे ध्वजारोहण शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.बंडू कोरडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री.शंकर गायकवाड,साहेबराव आदमाने,राजू रक्टे,भीमाशंकर लोखंडे,उत्तम रक्टे ,अनिल रक्टे ,अंजाबापू रक्टे ,रामभाऊ आदमाने ,अंबादास रक्टे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवानंद लांडे,उपाध्यक्ष संजय राशिनकर ,अशोक रक्टे , प्रकाश लांडे,संभाजी आदमाने ,ग्रामविकास अधिकारी शरद फाटके या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले.
मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण तसेच पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर विभूतींचे स्मरण आणि अभिवादन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत देशाच्या सुरक्षिततेकरिता कार्यरत असलेले पोलीस दलातील साईनाथ राशिनकर,सुभाष रक्टे,रुपाली राशिनकर ,लोकोपायलट संदीप रक्टे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.प्रसंगी निपुण माता पालक गटांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक किशोर जगताप यांनी केले.शाळेतील विद्यार्थिनी कु.आकांक्षा लांडे व कु.सायली रक्टे यांनी सूत्रसंचालन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे,गीतगायन सादरीकरण केले.देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.श्रीम.गीता गलांडे मॅडम ,श्री.चांगदेव डोंगरे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.आय.सी.टी.सी. प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री.अनिल धिरडे सर यांना मिळालेल्या 43 इंच स्मार्ट टीव्ही मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत शाळेला सुपूर्द केला.कॅनडा येथे स्थायिक असलेले श्री.बबलू वनवे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी अंगणवाडी ताई मंदाबाई रक्टे, वैशालीताई आदमाने,ग्रामपंचायत कर्मचारी विलास साळुंके,अंकुश रक्टे, विलास मंडलिक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायत धनगरवाडी यांच्याकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.ग्रामस्थांच्या वतीने सुभाष रक्टे , साईनाथ राशिनकर यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षक श्री.चांगदेव डोंगरे सर यांनी आभार मानले.