संपादकीय
श्री साईबाबांच्या चरणी सुमारे 42 लाख 80 हजार रुपयांचा सोनेरी मुकुट एका साई भक्ताने दिला दान!
0
9
1
3
7
8
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. त्यामध्ये रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने, मुकुट, अनेक वस्तू दान दिले जातात. आज एका साईभक्ताने साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या सोनेरी मुकूटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढवण्यात आला. मुर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्ताने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.
0
9
1
3
7
8