शिर्डीत श्री साई संस्थांनच्या वतीने उत्साहात होलिकात्सव साजरा! —————————————- संस्थांनचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी संपत्निक विधिवत पूजा करत श्री गुरुस्थान मंदिरासमोर पेटवली होळी!
शिर्डी(सत्तेचा महासंग्राम न्युज)
शिर्डीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होळीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. साई संस्थांनच्या वतीनेही होलीकात्सव साजरा करण्यात येत आहे.
आज रविवारी होळी निमित्ताने श्री साई संस्थांनच्या वतीने शिर्डीला श्री साई समाधीवर व साई मूर्तीला साखरेच्या कडे गाठींचा हार घालण्यात आला व पूजन करण्यात आले.
तसेच दरवर्षीच्या परंपरेनुसार श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळीनिमित्त आज रविवारी विधिवत पूजा करून होळी पेटविण्यात आली.
साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांची सुविद्य पत्नी सौ. ज्योती हुलवळे यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात आली. होळी पेटवून आरती करण्यात आली.
याप्रसंगी संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.