बाभळेश्वर येथे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी
बाभळेश्वर( सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे संत गाडगे महाराज यांची जयंती जेष्ठ नागरिक मंच, बाभळेश्वर ग्रामपंचायत, परिट समाज तरुण मंडळ, क्षितीज समाचार माध्यम समूह यांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छता याबाबत समाजजागृती करणारे संत गाडगे महाराज यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच गाडगे महाराजांच्या शिकवणुकीप्रमाणे वीरभद्र मंदिर परिसराची स्वच्छता करून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब बेंद्रे हे होते. यावेळी गाडगे महाराजांच्या समाजसेवेवर लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तुकाराम बेंद्रे, मा.सरपंच ज्ञानदेव म्हस्के, जेष्ठ नागरिक तान्हाजी बेंद्रे, जेष्ठ शिक्षक बोधक गुरुजी, विकास सोसायटीचे संचालक निवृत्ती बनसोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे विखे पाटील कारखान्याचे संचालक साहेबराव म्हस्के, मा.उपसभापती बबलू म्हस्के, जेष्ठ पत्रकार बापूसाहेब बेंद्रे, रामनाथ वाकचौरे, उपसरपंच राहुल डहाळे, मा.उपसरपंच अजित बेंद्रे, श्रीकांत शिंदे, पंडित बेंद्रे, रवींद्र बेंद्रे, रोकडे मामा फौंडेशनचे अध्यक्ष शंकर रोकडे, पत्रकार गोरखदादा गवारे. संजय इनामके आदी मान्यवर उपस्थित होते.
गाडगे महाराज जयंतीच्या निमित्ताने बाभळेश्वर गावातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल भाजप महिला आघाडीच्या डॉ.वैशाली दीपक म्हस्के, नूतन सरपंच संगीता श्रीकांत शिंदे, ग्रामविकास अधिकारी रफिक शेख, विमल रामकृष्ण खोबरे, बेबी तुपे, चंद्रकला बेंद्रे, गोकुळ बेंद्रे, नीता कांदळकर, मयुरी बैरागी, सोमनाथ वडतेले आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अविनाश तांदळे, सचिन तांदळे, अक्षय वाघ, अजय तांदळे, जावेद पटेल, अण्णासाहेब आरगडे, सोमनाथ मेढे, अशोक थोरात, बापूसाहेब भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पासाहेब दुशिंग सर यांनी केले तर आभार तान्हाजी बेंद्रे यांनी मानले.