श्रीरामपूर तालुक्यातील विकासासाठी कटिबद्ध ….आमदार लहू कानडे
टाकळीभान येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी
टाकळीभान:(सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असल्याचे उद्गार श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे विविध विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी आ. लहु कानडे यांनी काढले. यावेळी येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने आ. लहू कानडे व मान्यवरांचे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी आ. लहू कानडे यांच्या प्रयत्नातून मंजूर ४ कोटी २७ लक्ष विविध विकास कामाचा शुभारंभ आ. लहू कानडे गावातील मान्यवर ,पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये टाकळीभान ते गणेश खिंड रस्ता, टाकळीभान ते बेलपिंपळगाव रस्ता, कांबळे वस्ती ते तनपुरे वस्ती रस्ता,टाकळीभान ते घुमनदेव शिव रस्ता ,टाकळीभान कमान ते मारुती मंदिर पर्यंत स्ट्रीट लाईट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्याचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी बोलताना आ. लहू कानडे म्हणाले की टाकळीभान येथे विविध विकास कामांकरता भरीव निधी दिला असून भविष्यातही टाकळीभान गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील अशी ग्वाही यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिली. आपण आमदारकीच्या काळात समाजातील सर्व घटकांच्या विकासाकरता प्रयत्न केला असून तालुक्यातील शेतकरी कामगार ,मजूर, युवक युवती, महिला माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या विविध विकास शुभारंभ प्रसंगी एन एस यू आय चे प्रदेश सचिव अक्षय नाईक, नानासाहेब रेवाळे, भोकर चे माजी चेअरमन सुदाम पटारे, मा. सभापती वसंत रोटे , बाळासाहेब शिरसाठ (बेल पिंपळगाव) जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा.कार्लस साठे सर, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर प्रा. दिलीप कोकणे,प्रा. जयकर मगर, ग्रा.सदस्य भाऊसाहेब पटारे, भास्करराव कोकणे, आबासाहेब रणनवरे, विजय दवंगे, बबनराव मगर ,जालिंदर बोडखे, श्रीधर गाडे, अण्णासाहेब दाभाडे, भैय्या पठाण,बाबासाहेब तनपुरे , बंडोपंत बोडखे,गजानन कोकणे, बंडोपंत पटारे, खंडेराव गवांदे, रोहिदास पटारे, सुबोध माने,अनिल कोकणे, बंडोपंत कोकणे, राहुल कोकणे, अनिल कांबळे, किशोर गाढे ,काकासाहेब डिके, रामनाथ माळोदे ,मधुकर गायकवाड ,शरद कापसे ,सुनील बोडखे, शरद रणनवरे, तुषार दाभाडे, दादासाहेब कापसे,अक्षय खंडागळे, बंडूपंत वेताळ, सुनील रणनवरे,नानासाहेब रणनवरे, मायकल रणनवरे, कमलपूर घुमनदेव येथील रवींद्र मुरकुटे ,रमेश मुरकुटे ,संजय घोडे मुंजाळ मते, ग्रामसेवक रामदास जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल कडू, शिक्षक रुंद, टाकळीभान ग्रामपंचायतचे कर्मचारी आदींसह महिला माता भगिनी उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयकर मगर यांनी केले तर आभार प्रा.कार्लस साठे सर यांनी मानले.
चौकट: मोठ्या प्रमाणात झालेल्या तालुक्यातील विकास कामामुळे तसेच सर्वसामान्यांसाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव अहोरात्र झिजणाऱ्या आ. कानडे यांच्या प्रयत्नशील स्वभाव व कार्य कर्तुत्वामुळे पुनश्च श्रीरामपूर तालुक्याचे आ. लहू कानडेच होतील..अण्णासाहेब दाभाडे (जेष्ठ ग्रामस्थ, टाकळीभान)