विकास म्हस्के याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राहाता तालुका अध्यक्ष पदी निवड.
बाभळेश्वर वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभ अहमदनगर येथे पार पडला. या समारंभात मनविसे नेते अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राहाता तालुका अध्यक्षपदी विकास म्हस्के यांची निवड करण्यात आली .या प्रसंगी मनविसेचे संपर्क नेते दीपक शर्मा, संपर्क नेते संदीप पाचंगे, मनविसे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेश लूटे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे उपजिल्हाध्यक्ष रोहित एरंडे यांनी विकास म्हस्के यांच्या कामगिरीची दखल घेतली. अमित ठाकरे यांनी स्वतः त्यांना नियुक्ती पत्र देत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या
म्हस्के यांच्या निवडी निमित्ताने राहाता व शिर्डी .लोणी. बाभळेश्वर कोल्हार. तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोष साजरा केला. विकास म्हस्के यांनी सर्व कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि पक्ष बांधणीसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये राहाता तालुकाध्यक्ष गणेश जाधव. शहरअध्यक्ष विजू मोगले. तालुका उपाध्यक्ष विकी बेंद्रे. शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वाकचौरे. राहाता शहराध्यक्ष गणेश गाडेकर लोणी शहराध्यक्ष गणेश सुपेकर. कोल्हार अध्यक्ष गणेश रांधवणे .तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेना भाऊसाहेब सोनवणे . रवी चौधरी. मनोज कडू. क्षितिज तळोले. सौरभ चौधरी .स्वप्निल तनपुरे. प्रकाश म्हस्के. साई बेंद्रे किरण गजर. अभी पोपलघट, गौरव भालेराव, चेतन झिन्जाड, रुशी धीवर, किरण पगारे, भाऊसाहेब सोनवणे, प्रवीण आसने, आणि राम मचे यांचा समावेश होता. विकास म्हस्के यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून कौतुक व्यक्त होत आहे.