शिर्डी येथे दि. 14 सप्टेंबरला अ.नगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाच्या वतीने हिंदी दिन, हिंदी शिक्षक कार्यशाळा व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ!
शिर्डी (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ आयोजित हिंदी दिन समारंभ, हिंदी शिक्षक कार्यशाळा व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ शिर्डी येथे शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाच्या वतीने शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार प्राप्त शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर, तसेच हिंदी अध्यापक सेवा संघाचे सचिव सुरेश गोरे व हिंदी अद्यापक सेवा संघाचे विश्वस्त राजाराम टपले या प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत हिंदी दिन समारंभ साजरा होणार आहे. तसेच हिंदी शिक्षक कार्यशाळा ही दुपारी बारा वाजता होणार असून या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरण हिंदी विषयाची अवस्था या विषयावर चर्चा व कार्यशाळा होणार आहे. तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ दुपारी दोन वाजता श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव येथील के जे सोमैय्या महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉक्टर संजय दवंगे , व कल्याण येथील बांधकाम व्यावसायिक मिलिंद चव्हाण हे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज शिर्डी चे प्राचार्य गंगाधर वरपुडे हे राहणार आहेत. हे सर्व कार्यक्रम श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर हॉल (संस्थान पाचशे रूम समोर) शिर्डी येथे होणार आहेत. या कार्यक्रमाला हिंदी प्रेमींनी उपस्थित रहावे .असे आवाहन अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाचे उपाध्यक्ष रमजान सय्यद, सचिव सुरेश गोरे, सहसचिव एकनाथ जाधव, खजिनदार बाळासाहेब नवले, आदींसह सर्व पदाधिकारी तसेच सदस्य यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.