मराठी विषय महासंघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर.
डॉ.शरद दुधाट यांची सचिवपदी निवड.
लोहगाव (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याची ही कार्यकारिणी २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यरत राहणार असून जिल्हाध्यक्षपदी प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. शरद दुधाट, सचिवपदी वाळकी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक डॉ. अर्जुन चितळे तर कार्याध्यक्षपदी बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका डॉ. आशा पालवे यांची निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदी संतोष सोनवणे (नेवासा) रामदास कातकडे शेवगाव), धनाजी निकम (कर्जत) सुशांत सातपुते (संगमनेर ), कोषाध्यक्षपदी विनायक कुलकर्णी (श्रीरामपूर) माधव रेवगडे (अ.नगर), सतीश कदम (राहुरी), सुनील धनवटे (संगमनेर), समन्वयक पदी योगेश शेटे, (श्रीरामपूर) , शरद दारकुंडे (पारनेर), विजय बोर्डे (कोपरगाव), भावना वैकर (अ.नगर), शालिनी आंबरे (संगमनेर), प्रा. शशिकांत बनकर, श्रीरामपूर, सहसचिवपदी अनिल जाधव, (अ.नगर) किरण दारकर (नेवासा ), शरद तळेकर, (संगमनेर) प्रतिभा शेटे (पारनेर), गणपत धुमाळ (अकोले), सल्लागारपदी डॉ. राजेंद्र जाधव, (अ.नगर) राजेंद्र पटारे (राहाता), संजय पुलाटे, (श्रीरामपूर), विजय बारस्कर, (श्रीरामपूर), राजेंद्र वाघ, (कोपरगाव), श्रीकांत थोरात, (श्रीगोंदा ) तालुका प्रतिनिधी म्हणून भाऊराव नाडेकर, (अ.नगर ) धनाजी निकम (कर्जत) संपत वाळके (अकोले) संतोष सोनवणे, (नेवासा), विनायक कुलकर्णी, (श्रीरामपूर) रवींद्र घनवट, (राहुरी), सुशांत सातपुते, (संगमनेर), शरद दारकुंडे (पारनेर), पांगारकर एस. एस., (श्रीगोंदा), वर्षा सोनवणे (राहाता), माधव लाड, (पाथर्डी), सतिश डुचे, (जामखेड), विजय बोर्डे, (कोपरगाव) यांची निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल राज्य अध्यक्ष सुनील डिसले, बारामती, राज्यसचिव बाळासाहेब माने, मुंबई, कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे, वर्धा, राज्य सहसचिव स्मिता भुसे, अ.नगर यांनी अभिनंदन केले .