शारदा शैक्षणिक संकुलात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत संपन्न.
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता येथील शारदा शैक्षणिक संकुलामध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला .सकाळी शहरातून नवीन विद्यार्थ्यांची भव्य फेरी बँड पथक व मृदुंग, टाळ या वाद्यांच्या गजरात काढण्यात आली .विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, आनंददायी शिक्षण वाटावे, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण थांबावे, कुठल्याही प्रकारची टेन्शन न घेता विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे होते. विद्यार्थ्यांनी नियिमत शाळेत यावे. दर्जेदार शिक्षण संस्थेमध्येच आपला प्रवेश घ्यावा. प्रवेश घेते वेळेस त्या ठिकाणची शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, त्या शाळेची गुणवत्ता पाहूनच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा असे सांगितले .
संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभाग अहमदनगर यांनी मनोगतातून शाळेविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली .प्रवेशाबद्दल त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प वह्या, पेन वाटप करून त्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी पी.जी .गुंजाळ, माजी उपप्राचार्य रामभाऊ गमे ,अशोक बोरसे, शरद गमे ,राजेंद्र पटारे,रमेश आहेर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी अतिशय आनंदाचे वातावरण दिसून आले.