जलसंपदा विभागाने गोदावरी उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे.. गंगाधर चौधरी
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच चालू वर्षी अत्यंत कडक उन्हाळा जाणवत असून पुढे मे, जून महिना सुरू होईपर्यंत पिण्याच्या पाण्याचा, चारा पिकांचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राज्य सरकारने गोदावरीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली आहे. हा सर्व शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. चार आवर्तनाचे पाणी शिल्लक असताना त्यात रब्बीची दोन आवर्तने दिली. परंतु उन्हाळ्यासाठी एकतरी आवर्तन सोडल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर चौधरी यांनी केली आहे.
गंगाधर चौधरी यांनी म्हटले आहे की, जलसंपदा विभागाने गोदावरी उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे. गावातील प्रत्येक पाटात व चाऱ्याना पाणी सोडावे. यामुळे वाड्या वस्त्यांवरील बोअर, गावतळे, यातून पूर्ण क्षमतेने भरतील. यामुळे परिसरात उन्हाळ्याची तीव्रता जाणवणार नाही. त्यासाठी पाटबंधारे खात्याने सार्वजनिक विचार करावा. एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत गोदावरी कालव्याला उन्हाळी आवर्तन सोडावे यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार नाही मागील आढावा घेतल्यास जलसंपदा विभागाने पाणी शिल्लक ठेऊन अनेक वेळा नदीतून पाणी सोडण्यात आले आहे. इकडे जनावरे व माणसे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत तर दुसरीकडे पाटबंधारे विभाग उरलेले शिल्लक पाणी नदीला सोडतात व त्यातच धन्यता मानतात. तेव्हा सरकारने यावर बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. गोदावरीच्या उजव्या कालव्याला एप्रिल अखेर पाणी देण्याचे नियोजन करावे. नांदूर मध्यमेश्वर परिसरातील गावांची तक्रार निर्माण करून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला दहा वक्र दरवाजे बसविण्याच्या घाट घातला जात आहे. गोदावरी उजवा कालवा पावसाळ्यातील ओव्हरफ्लोच्या पाणी सोडन्यापासून वंचित ठेवण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नये. गोदावरी कालव्यांच्या हक्काच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यासाठी प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरेल सरकारला शेतकर्यांचा हा निर्णय झेपणार नाही तरी दहा वक्राकार दरवाजे बसविण्याचा निर्णय मागे घ्यावा आज निळवंडे धरणात पाणी शिल्लक आहे या पाण्यातून कोरडी गावतळी भरून द्यावीत. अशी मागणी गणेश परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी केली आहे,असे चौधरी यांनी सांगितले.
शासनाने निळवंडे धरणाच्या पाण्यातून कोरडी असलेले गावतळी, ओढे, नाले भरून देण्याचे आदेश त्वरित पाटबंधारे विभागास द्यावेत. गणेश कारखाना परिसरातील जिरायत भागाला जीवदान द्यावे यामुळे जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सुटेल. गंगाधर चौधरी, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ जिल्हाध्यक्ष