सावळिविहीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा .
भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर विद्यालयात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा!
शिर्डी ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बुद्रुक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात विद्यालयात साजरा करण्यात आला. सकाळी साडेसात वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तुपे सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयातून गावात प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी संपल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय सावळी विहीर बुद्रुक येथील ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पाडण्यात आले यावेळी सावळीविहीर गावचे सरपंच ओमेश साहेबराव जपे पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतचे ध्वजारोहण झाल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. माजी विद्यार्थी विकास संघाचे माजी विद्यार्थी व तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संदीप विघे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेमार्फत ग्लोबल फाउंडेशन मार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकली मिळाल्या व त्यांचे वाटप सावळी विहीर गावचे सरपंच माननीय ओमेश साहेबराव जपे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी अहिरे सोनालिका उत्तम, इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी अक्षरा दीपक आगलावे, कुमारी श्रद्धा सोन्याबापु गुंजाळ, कुमारी पूनम अनिल कुसाळकर या विद्यार्थिनींचा समावेश होतो. त्याच प्रकारे आज 26 जानेवारी दिवशी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी सिमरन अन्वर पठाण हिचा वाढदिवस असल्याने तिचा सत्कार माननीय सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.तसेच इयत्ता सातवीतील विद्यार्थी साहिल संतोष भोसले या विद्यार्थ्याला राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत तोंडपाठ असल्यामुळे माननीय सरपंच यांच्यातर्फे 501 रुपयाचे बक्षीस त्याला देण्यात आले. तसेच विद्यालयातील कुशल विद्यार्थिनी कुमारी विद्या विजय तासकर हिच्या उत्कृष्ट अशा संचालना मुळे तिला माननीय सरपंच ओमेश भाऊ जपे पाटील यांच्या हस्ते पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब जपे पाटील यांच्यातर्फे 701 रुपयाचे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे माजी विद्यार्थी माननीय अनिल भाऊ जाधव यांच्यातर्फे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे
आदरणीय मुख्याध्यापक माननीय तुपे सर यांचे मार्गदर्शन लाभले त्याच प्रकारे ज्येष्ठ शिक्षक श्री डुंबरे सर, श्री म्हस्के सर ,श्री खेडकर सर, श्री काळेगोरे सर, श्री खान सर, श्री वाकचौरे सर, सौ कानडे मॅडम, सौ भामरे मॅडम, सौ शिंदे मॅडम, सौ गायकवाड मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विविध कार्यालयातून आलेले कर्मचारी गावातील ग्रामस्थ, विद्यालयातील माजी विद्यार्थी, विद्यालयातील सर्व विद्यार्थी यांचे आभार मानण्यात आले.